Ad will apear here
Next
‘स्वेरी’च्या अभियांत्रिकी विभागाचा कार्यक्रम उत्साहात


सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मेकॅनिकल इंजिनीअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (मेसा) आणि कलकत्ता येथील दी इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनीअर्स (इंडिया) स्टुडंट्स चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वेरी’त यंत्र अभियांत्रिकी विभागाने ‘क्षितीज २ के १९’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीराम फायनान्स व्हॅल्यू डीव्हायसचे एचआर मॅनेजर किशोर कुमार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ‘स्वेरी’चे विश्वस्त प्रा. सूरज रोंगे, डिप्लोमा इंजिनीअरिंग कॉलेज प्राचार्य डॉ. एन. डी. मिसाळ, यंत्र अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा. सचिन गवळी, विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, प्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. पी. एस. कचरे, ‘मेसा’ समन्वयक प्रा. ए. के. पारखे, आयईआय कोलकाता स्टुडंट्स चॅप्टरचे समन्वयक प्रा. डी. टी. काशिद, विद्यार्थीप्रमुख राजेंद्र पवार, ओंकार पोरे व विविध महाविद्यालयांतून आलेले सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.

या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना इंजिनीअर्स मार्केटमधील ऊर्जा कशी असते व इंजिनिअर्स संधीचा फायदा कसा करून घेतात यावर त्यांनी प्रकाश टाकला. संस्थेचे विश्वस्त प्रा. रोंगे यांनी ‘क्षितीज २ के १९’ हा एक प्रेरणादायी कार्यक्रम असल्याचे नमूद करून ‘भविष्यातील स्पर्धा’ या विषयावर मुलांना मार्गदर्शन केले.

उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. या कार्यक्रमामध्ये सात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी बाहेरील कॉलेजमधून २००हून अधिक विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभागी झाले होते. स्पर्धा जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. तब्बल २१ हजार रुपयांची बक्षिसे विजयी स्पर्धकांना देण्यात आली.

बक्षीस वितरणाने कार्यक्रमाची सांगता झाली. या वेळी बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना केलेल्या सोय-सुविधेबाबत संयोजकांचे कौतुक केले. वीरेंद्र महाजन आणि वैष्णवी घोडके यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पवार यांनी आभार मानले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZVSBY
Similar Posts
‘स्वेरी’तर्फे पंढरपुरात येणाऱ्यांसाठी शुद्ध पाणी वाटप सोलापूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याचे उत्तम कार्य श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) करत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यअधिकारी प्रा. श्रीकांत भारतीय यांनी पंढरपूर येथे केले.
‘टेक्नोसोसायटल– २०१८’ तंत्रपरिषदेचे पंढरपुरात आयोजन पंढरपूर : ‘‘टेक्नोसोसायटल-२०१८’ या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे येत्या १४ आणि १५ डिसेंबर २०१८ या दोन दिवशी पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये (स्वेरी) आयोजन करण्यात आले आहे. देशातून आणि परदेशातूनही अनेक संशोधक, शास्त्रज्ञ या परिषदेला उपस्थित राहणार आहेत,’ अशी माहिती संस्थेचे
‘स्वेरी’मध्ये शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी सोलापूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची १४५वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. या वेळी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
‘स्वेरी’च्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नऊ डिसेंबरला पुण्यात सोलापूर : ‘पंढरपूर तालुक्यातील गोपाळपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅंड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे ‘ऋणानुबंध २०१८’ या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या मेळाव्याचे आयोजन या वर्षी पुण्यातील कोथरूड येथे करण्यात आले आहे. हा मेळावा नऊ डिसेंबरला होईल,’

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language